सुरक्षारक्षकाला गुप्तीचा धाक दाखवत दागिने,रोख रकमेसह लाखाचा ऐवज लंपास
मुलीला आणण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेलेल्या शिक्षक दाम्पत्याचे चोरट्यांनी घर फोडले विशेष म्हणजे सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला गुप्तीचा धाक दाखवत त्याला वेठीस धरण्यात आले व त्या नंतर चोरट्यानी दुसर्या मजल्यावर जात घर फोडले ही धाडसी चोरीची घटना सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास देवळाई भागातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या मनजित प्राईड येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
राजेंद्र रवींद्र बसवे (वय-47, रा.ए-2,201, मनजित प्राईड देवळाई परिसर) हे व त्यांची पत्नी योगिता बसवे दोघेही शिक्षक आहेत. त्यांची मुलगी प्राजक्ता ही नुकतीच 12 पास झाली आहे. ती मामाच्या घरी नंदनवन कॉलनी येथे राहायला होती. तिला आणण्यासाठी बसवे दाम्पत्य सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनी येथे गेले होते. रात्री दोघेही तेथेच थांबले होते. दरम्यान रात्री अडीच ते तीनच्या सुमारास सोसायटीमध्ये हत्यारबंद पाच ते सहा चोरटे शिरले त्यांनी या सोसायटीचे सुरक्षा रक्षक समुद्रवार यांना धारदार गुप्तीचा धाक दाखवत वेठीस धरले व त्यामधील दोघे हे दुसर्या मजल्यावर गेले तेथील बसवे यांचे बंद घराचे दरवाजा तोडून चोरट्यानी घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे तीन जोडी कानातील, एक नथ, मंगळसूत्र पॅडल, एक अंगठी व रुमालात बांधून ठेवलेले सुमारे 25 ते 30 हजार रोख असा एक ते दीड लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला ही प्राथमिक माहिती समोर आली.
बसावे दाम्पत्याने सर्व घराची पाहणी केली नव्हती त्यामुळे चोरीला गेलेल्या सोने व रोख यांच्या रकमेत वाढ होऊ शकते असे बसवे म्हणाले. या चोरीच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षकाला सोडून चोरट्यांचा टोळीने पोबारा केला.
आरोपींना होती दाम्पत्याबाबत माहिती
बसवे यांच्या घरातील सोने व रोख चोरी केल्यानंतर चोरटे खाली आले व त्यांनी गुप्तीचा धाकावर ओलीस ठेवलेल्या सुरक्षा रक्षकाला सोडले व दोघेही शिक्षक 80 हजार पगार घेतात चला आपले काम झाले.असे संभाषण आपसात करीत होते.त्यांना बसवे यांच्या घराची माहिती होती.